Author Topic: योध्याची विश्रांती !  (Read 378 times)

Offline Asu@16

  • Jr. Member
  • **
  • Posts: 246
योध्याची विश्रांती !
« on: January 07, 2018, 04:49:53 PM »
योध्याची विश्रांती !

शस्त्र धरिले हाती,
वार कुणावरती !
अंधारल्या दिशा,
पडलो सरणावरती.
वार ज्यांनी केले
ते आपलेच होते.
शस्त्र त्यांच्या हाती
परंतु त्यांचे नव्हते.
चेहऱ्यात आेळखीच्या
शोधितो अश्रू अंती
आप्त स्वकीय सगळे !
ना मिळाली विश्रांती.
                 शस्त्र धरिले हाती,
                 वार कुणावरती !

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita

Marathi Kavita : मराठी कविता