Author Topic: चुका  (Read 700 times)

Offline Asu@16

  • Jr. Member
  • **
  • Posts: 224
चुका
« on: October 29, 2017, 02:35:08 PM »
 चुका

वागावे कसे
समजत नाही
चुका कळतात.
पण,
वळत नाही.

आयुष्याच्या वाटे
चुकांचे काटे
पायी टोचतात.
पण,
बोचत नाही.

चुकांच्या थपडा
गाली बसतात
अश्रू चमकतात.
पण,
ओघळत नाही.

आयुष्य हीच
चूक खरी
मनी समजते.
पण,
उमजत नाही.

चुकत माकतही
शिकत नाही.
'ढ' म्हणा
पण,
गा...वातला नाही.

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita

Marathi Kavita : मराठी कविता