Author Topic: भूक  (Read 322 times)

Offline Pravin Dongardive

  • Newbie
  • *
  • Posts: 12
  • Gender: Male
भूक
« on: December 30, 2017, 05:00:00 PM »
        भूक
आजकाल कळत नाही,
कुणाला कशाची भूक.
कुणाला भाकरीची तर,
कुणाला पैशाची भूक.
आतड्यालापीळ देवून,
मिटवावी लागते भाकरीची भुक.
पण पैशाची भूक मिटेल का?
कित्येक मरतात इथे,
रोजच्याच उपासमारीने.
त्यांच्या भाकरीचा प्रश्न सुटेल का?
नववर्षाच्या स्वागतासाठी,
असतील कित्येक मेजवान्या.
घास भरवू प्रत्येक मुखी,
भुकेने केविलवाण्या.
भूक शिकवते कधी चोरी,
भूक लटकवते कधी दोरी.
भूक असावी मानसं जपणारी.
अशी भूक हि न संपणारी.
                                    मो – ८८८८१७६१८४

Marathi Kavita : मराठी कविता