Author Topic: सावली  (Read 503 times)

Offline Asu@16

  • Jr. Member
  • **
  • Posts: 246
सावली
« on: January 20, 2018, 09:49:36 PM »
 सावली

धन्य धन्य माझ्या,
सावलीची साथ. 
सदैव दिनरात,
जशी दिव्याची वात.
विझता दिवा,
होतो अंधार.
तरी सोडीना,
वात दिव्याचा आधार.
निष्प्राण देह,
जरी अंतकाली.
साथ सोडीना,
तरी माय सावली.
प्रियेहुन ही,
प्रिय सावली.
जगी माऊली,
ही अमर जाहली.
मायलेकरांची इथे, 
संपली कहाणी.
पुन्हा सांगण्या,
मूक झाली वाणी.

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita

Marathi Kavita : मराठी कविता