Author Topic: दैना मुंबईची  (Read 319 times)

Offline Asu@16

  • Jr. Member
  • **
  • Posts: 246
दैना मुंबईची
« on: February 10, 2018, 04:03:07 PM »
  दैना मुंबईची

जागा तिथे झोपडी होई
करदात्यांची कोंडी होई
रक्षण करती दादा-भाई
गोरगरिबांना देती सोई
रेल्वेलाईनही सुटली नाही
रुळालगत झोपडी होई
चोराचिलटांना आश्रय देई
धन्य धन्य तू झोपडीमाई
पोसती पुढारी दादा-भाई
निवडणुकीत करती भरपाई
अनधिकृतच्या अधिकृत होई
हळूच टॉवर तेथे येई
गरीब पुन्हा झोपडीत जाई
असेच चक्र चालत राही
नवीन लोंढा धावून येई
लोकसंख्येला मग पूर येई
गरीब जनता वाहून जाई
पुढाऱ्यांना तर लाजच नाही
वोट बँकेची त्यांना घाई
मुंबईची मात्र दैना होई.

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita

Marathi Kavita : मराठी कविता