Author Topic: धर्मद्वेषी वारे  (Read 122 times)

Offline नास्तिक

  • Newbie
  • *
  • Posts: 3
धर्मद्वेषी वारे
« on: May 10, 2018, 01:54:06 PM »
पिकांचं काय घेऊन बसलात,
दूधाहून इथे पाणी महाग.
जनतेचे प्रश्न झाकून टाकू,
पेटवून धर्मद्वेषी आग.

बाबर, बाबरी, जिन्ना महोदय,
विषय आहेत खूप सारे.
इतिहासाच्या पुस्तकांमधून,
खणूनी आणखिन काढू ना रे.

अन्धकार त्याने पसरवू असा,
की प्रश्र्न लपून जातील सारे.
नी यातना रंजल्या-गांजल्यांच्या,
ढोंगी भोजन पंक्तीत संपतील ना रे.

खोट्या मशालींच्या मदतीने,
प्रचाराचा प्रकाश पाडूया रे.
निवडणूकांआधी पेटवू रण,
नी पसरवू धर्मद्वेषी वारे.

Marathi Kavita : मराठी कविता