Author Topic: जीवनगाणे  (Read 450 times)

Offline Asu@16

  • Jr. Member
  • **
  • Posts: 246
जीवनगाणे
« on: June 13, 2018, 12:53:53 PM »
काव्यपूर्ती स्पर्धा - निहार प्रकाशन पुणे, पारितोषिक प्राप्त कविता -

               जीवनगाणे


रणभूमी वा रंगभूमी, नकोच जीवनाची
जन्ममृत्यूच्यामध्ये असावी झुळूक पवनाची

असो जगणे साधे, ना आस वैभवाची
सुख समाधान तृप्त लहर सदैव सौरभाची

हेवेदावे कडवट चव, नकोच वैराची
मुग्ध मधुर ओठी असावी ओढ वैखरीची

हृदयातून नित्य वाहो, धार अमृताची
नको मुखवटे चेहरे खोटे आण या मनाची

जन्ममृत्यू प्रवास आहे, साथ रे क्षणांची
एकमेका हात देऊ भरवू मैफल माणसांची

युद्ध नको नाट्य नको, ओढ जीवनाची
माणसा रे माणूस हो तुज शपथ मानवाची

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
 
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Marathi Kavita : मराठी कविता