Author Topic: समज गैरसमज  (Read 539 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,311
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
समज गैरसमज
« on: June 23, 2018, 11:05:25 AM »
समज गैरसमज

होतयं काय कि.. आम्ही
जुन्या डायऱ्या चाळतो,
चुक भुलीतल्या हिशोबाच्या...
आणि त्यात आजचं जीवन
जगायचं राहून जातं,
कधी स्वतःच्या चुकीने
वा कधी परीस्थिती मुळे...
ठरवलं तर समजून घेता येतं..!
तसं बरचं काही,
पण... मीपणा, अहंम
आडवा येतो,
कुणाचा, कसा आणि
कधी हा प्रश्न गौण आहे,
आडवा येतो
हे सत्य आहे, ते सुद्धा
आपण स्विकारत नाही...
एकमेकांना दोष देणं तसं
कठीण नक्कीच नाही,
उलट ते सर्वात सोप्पं आहे...
कुणालाही...

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९

Marathi Kavita : मराठी कविता