Author Topic: सवत  (Read 281 times)

Offline Dnyaneshwar Musale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 143
  • Gender: Male
सवत
« on: August 22, 2018, 11:55:02 PM »
सवत
खरतर माझ्या कवळ्यापणातच
जेव्हा तु मला पहिल्यांदा
बघायला आलास तेव्हाची
तुझी पिळदार मिशी
आणि उमललेला चेहरा पाहताच
मी तुला नवरा म्हणून स्वीकारलं.

बापाची इच्छा म्हणुन बापानं
मोठ्या दिमाखात लग्न लावुन दिलं,
तुला आठवत नसेल पण लग्नाचा फोटो
तु उचकून बघ आज ही लोक बोलतात
तुमची जोडी लक्ष्मी नारायणाची आहे.

पण तु लग्नाच्या आधीपासूनच
सवत घरी नांदवत होता याचा
मला लवकर थांगपत्ता लागलाच नव्हता,

आता तुझ्या उशिरा येण्यापर्यंत मी उंबऱ्यावर
दावणीला बांधल्यासारखी उपाशी पोटी
वाट बघत असते,
तु येतोस अगदी हालत डुलत,
आणि तुझी दारू रोज असते
मला काहीतरी बोलत.

दिसभर कामावर जाऊन मी घरखर्च चालवते
याची तर मला मुळीच खंत नाही,
पण किराण्याची उधारी असताना
 तुझा चकना आणि दारू रोज चोखांड भाकरीला ही
मला महाग करत असतो.

जर तुला तुझी दारूचं नांदवायची होती
तर मला बायको म्हणुन तु का स्वीकारलं
या कोड्याच गणित मला कधी उमगलच नाही,
कधी नशा जर उतरलीच तर वळुन बघ
नवरा म्हणुन तु घरात गाजवलं का काही.

मी गावातुन जाताना त्या बेवड्याची बायको
म्हणून मला सगळे ओळखतात
त्याच मला आता काहीच वाटत नाही,
तु निसटलास
पण खरतर पुन्हा आई आणि बाप म्हणून
लेकरासाठी  माझीच परीक्षा सुरू झाली,
कारण एकदा मला ही ऐकायचं गावातल्या त्याच तोंडानकडून गावातून जाताना,
"तो नाही का मोठा आफिसर त्याची आई आली".

Marathi Kavita : मराठी कविता