Author Topic: नका विसरु त्यांना  (Read 517 times)

Offline kaustubh6399

  • Newbie
  • *
  • Posts: 1
नका विसरु त्यांना
« on: October 08, 2018, 09:08:26 PM »
नका विसरु त्यांना

नका विसरु त्यांना ,
ज्यांनी तुम्हाला हे जग दाखवलं,
मनात आलं असतं त्यांच्या,
 तर ते ही शक्य झालं नसतं.

नका विसरु त्यांना ,
ज्यांनी तुम्हाला आश्रय दिला,
नाहीतर तुम्हाला रस्त्यावर सोडण्यात,
 त्यांना तीळमात्र लाज वाटली नसती.

नका विसरु त्यांना ,
ज्यांनी तुम्हाला सुखात ठेवले,
वाटल्यास तुम्हाला दुःखाची झळच दिली असती.

नका विसरु त्यांना ,
ज्यांच्यामुळे तुम्ही आज खुशाल जगत आहात,
नाहीतर तुमचा आनंद हिरावण्यात,
त्यांना काहीच वाटलं नसतं.

असाल तुम्ही महान,
पण शेवटी लेकरं आहात तुम्ही त्यांची,
जीवाभावाच्या या आईवडिलांना ,
गरज नाही का तुमची??
 
            -कु. कौस्तुभ रोहिदास राणे.

Marathi Kavita : मराठी कविता


Ashish Rane

  • Guest
Re: नका विसरु त्यांना
« Reply #1 on: October 08, 2018, 09:23:55 PM »
जबरदस्त भावा

Kaustubh Rane

  • Guest
Re: नका विसरु त्यांना
« Reply #2 on: October 08, 2018, 10:50:37 PM »
thnk u bhava...