Author Topic: सापडली  (Read 71 times)

Offline Sagar salvi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 105
सापडली
« on: May 22, 2019, 06:13:16 PM »
आई सापडली  !
कसा सापडलो तुला त्या रस्त्याच्या कडेला,
आभाळ कोसळलेल होत आणि ढग कडाडलेला.

उचलस तू मला मी आलो भानावर,
जसा सांभाळून ठेवला, पाय थेंबाने पानावर.

न्हवती तयारी मनाची तिथं माझं न्हवतं काही,
तो रस्ता बाप होता ती पेटी माझी आई.

मी संभाळीन त्याला तुझा आवाज होता मोठा,
वासराला मिळालेला अनोळख्या गाईचा गोठा.

तुझ्या मायेच्या उशीवर मी झोपलो पटकन,
नाही जाग आली मधे नाही रडलो दचकत.

तुझ्या गाण्याच्या सुरात माझी रात्र जाई पार,
तिकडे गाड्यांचा आवाज आणि थंडीचा होता मार.Marathi Kavita : मराठी कविता