Author Topic: घर  (Read 96 times)

Offline Sagar salvi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 105
घर
« on: May 22, 2019, 07:18:42 PM »
घर !
घराने घातलेला अंगरखा (छत)
जवळ जवळ फाटला होता,

चार पैकी दोन राहिलेल्या
भिंतींचा उर दाटला होता.

कळवळत होती प्रत्येक पायरी
जमीन अजून थरथरत होती,

श्वास सोडला होता अंगणाने
घरातली वात धडधडत होती.

पडदे उडून उडून दमले होते
अर्धे तुटून खाली पडले होते,

निखळून पडले होते खिडकीचे दात
दरवाजा तुडवत वारा आला आत.

Marathi Kavita : मराठी कविता