Author Topic: "ती" आणि "हि"  (Read 1343 times)

Offline ishudas

  • Newbie
  • *
  • Posts: 2
"ती" आणि "हि"
« on: November 06, 2016, 07:11:05 PM »
“ती” आधीची आणि “हि” आताची...
असं “त्या”च गणित अगदी सोप्पं होतं...
पण...
“ती”ची नुकतीच भेट झाली
आणि “हि”च लग्न ठरलं...
सोप्पं असलेलं गणित मित्रांनो
पुरतच बिघडलं...

“हि”च्या वजाबाकीच्या काळात
“ती” “त्या”च्या आयुष्यात आली...
आणि एका पदाच्या बेरजेमुळे
पदावली अवघड झाली...

तुम्हाला सांगू कोणाबद्दल
आता काही कळेना...
“त्या”ला “ती” दिसल्यापासून
“हि”च्या आठवणीला वेळ मिळेना...

आता एका हप्त्याआधी
“हि”ची  Booking  झाली...
निमंत्रण आवर्जून दिलं “त्या”ला
किंबहुना पत्रिकाच घरी आली...

“हि” तर गेलीच म्हणून
”तो”  “ती”च्याकडे आला...
पण “ती”चे नखरे पाहून
“तो” खूप निराश झाला...

“ती”च्याशी बोलायची “त्या”ची
हिम्मत काही होईना...
“ती”ला खूपच  Attitude,
“ती” काही भाव देईना...

इतक्यात “हि”ची भेट नाही,
पण “ती”ला एवढ्यात पाहिलं...
“हि”च्या “ती”च्या नादात
“त्या”चं गणित सुटता-सुटता राहिलं...

गणित मी मांडलं
पण पुस्तक माझ नाही,...
माझा आणि या गणिताचा
 संबंधच नाही काही...

पण तरी आता मित्रांनो
मी विचारतो बर असं... 
आता “त्या”च्या गणिताचं
 उत्तर काढू कसं  ???

................ईश्वर चौधरी (इशुदास)

Marathi Kavita : मराठी कविता