भिजलेले पान

Started by विक्रांत, December 18, 2012, 03:47:09 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

भिजलेले पान
भिजलेली फांदी
भिजलेल्या फांदीवर
भिजलेले पक्षी
भिजलेली माती
गवताची पाती
गवताच्या पातीवर
पाण्याचीच नक्षी
पाण्याचे ओघळ
वाहती खळखळ
वाहणाऱ्या जळी
एक पोर अवखळ

विक्रांत  प्रभाकर


केदार मेहेंदळे


केदार मेहेंदळे

विक्रांत,
ह्या अवखळ पोरीला मी जरा मोठी करून शृंगारिक कवितेतल्या पावसात भिजवलं आहे. बघ तीच 'भिजलेली' हे रूप तुला आवडतं  का? 

http://marathikavita.co.in/index.php/topic,10302.0.html

विक्रांत

धन्यवाद .केदार .

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]