बंद खिड़की

Started by anolakhi, July 18, 2009, 12:30:43 PM

Previous topic - Next topic

anolakhi

तुझ्या स्वयंपाक घराची ती बंद खिड़की


आणि त्या खिड़की मागे,


संथ हालचाल करणारी तुझी सावली.




तसे हे दृश्य मी रोज़च पहातो.


आणि घरी परतल्यावर,


एकांतात तुझ्याच विचारात नहातो.




तुझ्यात पुरता हरवल्यावर मग मी तुला हाक मारतो.


"राहुंदे तो स्वयंपाक, ये इथे माझ्या जवळ बस."


आतून उत्तर न आल्यावर मग मी मलाच टपली मारतो.




आणि मग परत रात्र तुझ्या आठवनित जागल्यावर,


पहाटे डोळे चोळत उठतो.


आणि दिवसभर असा वागतो जसा कोणी वागतो स्वतहालाच विसराल्यावर.




मग पुन्हा संध्याकाळ येते,


पाय आपणच पुन्हा त्या रस्त्याकडे वळतात,


काही अंतर चालल्यावर मान पुन्हा डावीकडे वळते,


कारण मला परत दिसते....




तुझ्या स्वयंपाक घराची ती बंद खिड़की


आणि त्या खिड़की मागे,


संथ हालचाल करणारी तुझी सावली.
[/b]

MK ADMIN