40 मराठी चारोळ्या……प्रमोद

Started by pomadon, September 06, 2009, 02:49:19 PM

Previous topic - Next topic

pomadon

1. घरात काळोख शिरेल म्हणुन

    घरात काळोख शिरेल म्हणुन
    मी सगळी दारं लावून बसलो
    आणि स्वत:च्या खुळेपनावर
    अंधारात बसून हसलो


2. सुंदर लाटेवर भाळून

    सुंदर लाटेवर भाळून
    सूर्य तिच्याकडे आकर्षला
    दिवसाची खुप आश्वासन
    देऊन रात्री मात्र फितूर झाला


3. चंद्राबरोबर चांदनी एकच असते

    चंद्राबरोबर चांदनी एकच असते
    पण तीचं नक्की सांगता येत नाही
    त्याला रोज बदलताही येइल पण
    तीला ते जमणार नाही



4. गावातले सगळे रस्ते

    गावातले सगळे रस्ते
    रात्री गावाबाहेर पडतात
    मला घरीच परतायचं असतं
    पण ते मला रानात नेउन सोडतात


5. रात्रीची जागी राहून

    रात्रीची जागी राहून
    मी त्या चांदनिला बघत होती
    ती सुद्धा माझ्याप्रमाणे
    एकटीच हसत होती........


6. नाही म्हणाले नसले तरी

    नाही म्हणाले नसले तरी
    हो सुद्धा बोलले नाहीतो
    विचारून थांबला तरी
    मला काही सुचले नाही ....


7. तू सोडून जाशील म्हणुन

    तू सोडून जाशील म्हणुन
    मी वेडी झाली होती
    आणि मी वेडी झाली म्हणुन
    तू सोडून गेलास .......


8. काय सांगू तुला

    काय सांगू तुला
    जग माझ्यावर हसतं
    तुझ्यासाठी वेडी झाली
    असं उगाच बोलतं.......


9. मन किती वेडं असतं

    मन किती वेडं असतं
    नको तिथे धावतं
    आपल्याला काय हवं आहे
    हे त्याला बरोबर कळतं


10. तुझ्या शिवाय जगण्याचा

    तुझ्या शिवाय जगण्याचा
    विचार आता करते ....
    जीवन इथेच थांबलं बघ माझं
    आता मरन्याचा विचार करते .....


11. सगळ्यान मध्ये तू असलास तरी

    सगळ्यान मध्ये तू असलास तरी
    माझ्यासाठी तू ख़ास आहेस ....
    माझे कड़क नियम दुसर्यांसाठी
    तुला सगळ माफ आहे ......


12. शहाणं बनण्यापेक्षा मला

    शहाणं बनण्यापेक्षा मला
    वेडं व्हायला आवडेल
    तुझ्या सारख्या (दिड ) शहाण्यावर
    विश्वास ठेवायला आवडेल .....


13. जगणं असह्य झाल्यावर

    जगणं असह्य झाल्यावर
    मरणही उशिरा येते
    दुःख अजुन बाकी आहे
    हे तेव्हा कळून येते


14. डोळ्यातून अश्रु ओघळला

    डोळ्यातून अश्रु ओघळला
    की तोही आपला राहत नाही
    वाईट याचंच वाटतं की
    दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही।


15. तुझ्या विषयी बोलताना

    तुझ्या विषयी बोलताना
    मी ज़रा विचार करते
    माझ्याशिवाय कोणी नसेल
    याची मी खात्री करते .....


16. तू मला फसवणार होतास कधीतरी

    तू मला फसवणार होतास कधीतरी
    हे आधीच मला माहीत होत
    पण बर झाल मला अद्दल घडली
    हे मनच माझ मानत नव्हत ........


17. घरात काळोख शिरेल म्हणुन

    घरात काळोख शिरेल म्हणुन
    मी सगळी दारं लावून बसलो
    आणि स्वत:च्या खुळेपनावर
    अंधारात बसून हसलो.....


18. तुझ्या आठवणी आठवण्याचा

    तुझ्या आठवणी आठवण्याचा
    रोग लागलाय मला
    तुझ्याकडचं विसरण्याच
    औषध दे मला


19. तुझ्या पासून दूर जाताना

    तुझ्या पासून दूर जाताना
    मन जड़ झाले होते
    चेहरा हसरा दाखवला तरी
    डोळे भरून आले होते ...


20. मला हव्या असणा-या व्यक्तिंपैकी

    मला हव्या असणा-या व्यक्तिंपैकी
    तू एक आहेस ....
    पण तुझी इच्छा मी का करू ???
    तू तर माझाच आहेस....


21. प्रेम करायचाच म्हटल तर

    प्रेम करायचाच म्हटल तर
    कुनाशिही जमत नाही
    मनासारख्या जोड़ी दाराशिवाय
    संसारात मन रमत नाही


22. कदाचित म्हणताना माणूस

    कदाचित म्हणताना माणूस
    नशिबावर अवलंबून असतो
    हजारदा त्याच्याकडून फसुन
    हित्याच्यावरच विश्वास ठेवतो


23. ओळखिच्या माणसाने

    ओळखिच्या माणसाने
    ओळखल्या सारखं वागायचं
    कारण शोधून बोलन्यापेक्षा
    कारनाशिवाय बोलायचं....


24. दिवेलागण वणव्यासारखी पसरते

    दिवेलागण वणव्यासारखी पसरते
    रात्र झाल्यावर
    पण आपलं घर मात्र उजळतं
    तू दाराशी आल्यावर


25. रात्रं पटकन सरते

    रात्रं पटकन सरते
    तुला उराशी धरून
    मग दिवसभर तुला पहात राहते
    मी परक्यासारखं दुरून


26. आभाळ बरसताना

    आभाळ बरसताना
    सरळ दार लावून घ्यावं
    नाहीतर स्वत:ला
    दिशाहीन जाऊ द्यावं


27. पाऊस म्हणजे खरं सांगतो

    पाऊस म्हणजे खरं सांगतो
    परीक्षा असते स्वत:ची
    किती गोष्टींची कबुली
    आपण देत राहतो स्वत:शी


28. कुठून तरी येउन

    कुठून तरी येउन
    पाऊस ईथला होउन जातो
    आणि माझ्यासोबत मी बनुन
    तो हलवा होउन पहातो


29. वेड्या क्षणी भास् होतो

    वेड्या क्षणी भास् होतो
    तू जवळ असल्याचा
    डोळे उगीच दावा करतात
    तू स्पष्ट दिसल्याचा


30. पाऊस एकदाचा पडून जातो

    पाऊस एकदाचा पडून जातो
    पावसाचे दिवस असले की
    आसवांचं तसं नसतं, ते पुन्हा येतात
    एकदा डोळे पुसले की


31. पावसावरच्या निबंधाला

    पावसावरच्या निबंधाला
    कधीच पूर्ण मार्क मिळत नाहीत
    कारण मार्क देणारा आणि घेणारा
    दोघांनाही तो कळत नाही


32. श्रवण म्हणजे मला वाटतं

    श्रवण म्हणजे मला वाटतं
    प्राजक्ताचे दिवस
    स्रुष्टिने कधीतरी करून
    फेडलेला नवस


33. शब्द हा शेवटचा उपाय आहे

    शब्द हा शेवटचा उपाय आहे
    प्रश्नांचं उत्तर मिळायला
    नाहीतर एक कटाक्ष पुरतो
    मनातलं गुज कळायला


34. मनाची तहान

    मनाची तहान
    पाण्यानं भागत नाही
    हे बरं आहे की सगळ्यानाच
    मनाची तहान लागत नाही


35. मला एक सुखी माणूस

    मला एक सुखी माणूस
    त्याची दु:ख सांगत बसला
    आणि माझा दाटून आलेला अश्रु
    मी निमुटपणे पुसला


36. त्याच्याकडे काय मागायचं

    त्याच्याकडे काय मागायचं
    हेच आपल्याला कळत नाही
    म्हणुन बाकी सगळ मिळत राहतं
    नेमकं जे हवं त्या कधी मिळत नाही


37. पुढे अथांग पसरलेला सागर

    पुढे अथांग पसरलेला सागर
    मागे पसरलेला माझा गाव
    मधे मी ठिपक्या एवढा
    तरी मला माझं असं नाव


38. पहाटेआधी जाग येणं

    पहाटेआधी जाग येणं
    किती त्रासदायक असतं
    सोसून झालेलं आयुष्य
    उघड्या डोळ्याना दिसतं


39. एक निरंतर प्रवास सुरु होतो

    एक निरंतर प्रवास सुरु होतो
    माझ्याकडून माझ्याकडे
    आणि तुला वाटतं मी निघालो
    पाठ फिरवून तुझ्याकडे


40. तू क्षितिजासारखा......

    तू क्षितिजासारखा......
    जवळ यायला लागलं की लांब राहतोस
    आणि यायचं थांबलं की
    आशेने पाहतोस

MK ADMIN


madhura

नाही म्हणाले नसले तरी
    हो सुद्धा बोलले नाहीतो
    विचारून थांबला तरी
    मला काही सुचले नाही ....

ha ha ha mast re  :D

pomadon


    आणखी तीन चारोळ्या...

1) प्रेम केलं जात नाहि,
     ते घडत असतं
     ह्रुदयातल्या कुठल्यातरी कप्प्यात
     ते जाणीवपूर्वक दडत असतं !!!!!

2) हसतांना तुझ्या गालावर,
     एक छान खळी पडली होती
     माझ्यासकट कितीतरी मुलं,
     त्या खळीला बळी पडली होती !!!!!

3) तुझ्या त्या शेवटच्या भेटीनंतर
     आयुष्यात एक न संपणारं धुकं पडलं आहे
     मला जे पुर्ण करायचं होतं
     ते स्वप्नचं त्या धुक्यात जाऊन दडलं होतं !!!!!

santoshi.world

hya tin charolya khup avadalya  :) ......... pan tuzya aahet ka varchya sarva charolya?? ............ khali nav ka nahi dila aahe kavi cha  :P

  तू सोडून जाशील म्हणुन
    मी वेडी झाली होती
    आणि मी वेडी झाली म्हणुन
    तू सोडून गेलास .......


11. सगळ्यान मध्ये तू असलास तरी

    सगळ्यान मध्ये तू असलास तरी
    माझ्यासाठी तू ख़ास आहेस ....
    माझे कड़क नियम दुसर्यांसाठी
    तुला सगळ माफ आहे ......


16. तू मला फसवणार होतास कधीतरी

    तू मला फसवणार होतास कधीतरी
    हे आधीच मला माहीत होत
    पण बर झाल मला अद्दल घडली
    हे मनच माझ मानत नव्हत ........

pomadon

ह्यातिल काही माझ्या आहेत तर काही माझ्या मित्राने लिहिलेल्या आहेत्......
santoshi.world क्षमस्व............


nirmala.

 आणखी तीन चारोळ्या...

1) प्रेम केलं जात नाहि,
     ते घडत असतं
     ह्रुदयातल्या कुठल्यातरी कप्प्यात
     ते जाणीवपूर्वक दडत असतं !!!!!

2) हसतांना तुझ्या गालावर,
     एक छान खळी पडली होती
     माझ्यासकट कितीतरी मुलं,
     त्या खळीला बळी पडली होती !!!!!

3) तुझ्या त्या शेवटच्या भेटीनंतर
     आयुष्यात एक न संपणारं धुकं पडलं आहे
     मला जे पुर्ण करायचं होतं
     ते स्वप्नचं त्या धुक्यात जाऊन दडलं होतं !!!!!

mala ya tin khup manapasun awadlya..........
kharach khup sundar ahet,....... :)


rudra