घर वाळूचे

Started by विक्रांत, November 12, 2014, 11:31:12 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

घर वाळूचे टिकते तोवर
ओल असते आत जोवर
घट्ट बसती शंख शिंपले 
उंच उभारल्या भिंतीवर

उन कधी मग येतो वारा
कोसळतो तो खुळा मनोरा
ढीग तोही नंतर नुरतो 
दूर दूरवर रिता किनारा

स्वप्न कालची गेली सरली
वाळूवरती रेष न उरली
उरे प्रतिमा कुणी खेचली 
हृदया मध्ये जपून ठेवली

असेच असते वेड्या जीवन
काय फायदा उगा रडूनी
पहा हवे तर चित्र कधी
धूसर धुकट आत शोधूनी

विक्रांत प्रभाकर

सतिश

अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण कविता आहे... छान..

विक्रांत

उत्तर पाठविले आहे ..मैल मध्ये पहा .. :)