पाय उचलत नव्हता माझा

Started by विक्रांत, November 13, 2014, 12:18:43 AM

Previous topic - Next topic

विक्रांत


पाय उचलत नव्हता माझा
तिला सोयर सुतक नव्हते
उठता उठता पुन्हा बसलो
खरच तिला कळत नव्हते ?

मी कुणाशी बोलत होतो
नीट मला उमजत नव्हते
जडावला का जीव तिच्यावर
कोड सुटता सुटत नव्हते

माझे जगणे द्विधा वाहणे
पाणी संथही होत नव्हते
तिच्या डोळ्यातील दर्यामध्ये
माझे मजला सापडत नव्हते

कसे समजावू आता तिला
शब्दही मज मिळत नव्हते
कवितेचे एकही पान अन
मनातून उघडत नव्हते

किती बोललो कुणास ठावूक
बहुदा तिलाही वळत नव्हते
मजशी बोलता ना नक्की
प्रश्न कानावर पडत होते

विक्रांत प्रभाकर

सतिश

क्या बात है..!  फारच सुंदर..!!