लानपन

Started by anuswami, November 14, 2014, 05:38:39 PM

Previous topic - Next topic

anuswami

**  लानपण  **

सुकात हाय मी लई आज
तरी बी काईतर कमीच हाय
काय करू ह्यो पैका घीउन
त्यान लानपण मागारी येणार नाय




कळीत नवतं तवा काय बी
पर का त्या दिसांची वढ लागतीया
जणू गोट्यांचा इस्काटलेला डाव मांडायला
रिंगनी पुना माजीच वाट बगतीया




बचाबचा डबक्यातलं पाणी उडवत
भिजवायचू साऱ्या पोरा पोरिस्नी
आन घरी आल्याव मायच्या हातचं
फटक मिळायच समद्यास्नी




भांडलू आसल कितीदा बी
पर दुस्मनी आमाला नवती ठाव
झगडा झाला संभर येळा
तरी पूना येक वायचू भईन आन भाव




बा च्या खांद्याव दिसभर बसून
पैकं नसताना बी फिरायची जत्रा
रिल्वी चा डबा बगितला की
आठवायचा घरचा गळका पत्रा




कदीतरी जातू तिकड सहज
आजुनही दिसत्यात कट्ट्यावच्या रेगुट्या
माती जाऊन रस्त्याव आलया शिमिट
नाय खेळत आता तितं कोणच आट्यापाट्या





उगीच मोटा जालो आस वाटतं
आन उगीच मिळालया हे शानपण
काय बी मना तुमी पर
लई झकास आसतय लानपन.....
           लईच झकास आसतय लानपन........

कवी :- अनिकेत स्वामी, अकलूज
९५५२०३०८२८

सतिश

लानपण... लईच झकास लिवलय तुमी.. काय बी बोला.. लईच भारी..