मन करारे प्रसन्न

Started by anuswami, November 15, 2014, 08:21:57 PM

Previous topic - Next topic

anuswami

**  मन करारे प्रसन्न  **


"रोजचीच बाई मेली ही कटकट
मला आलाय याचा खुप वीट
सुखच नाही जिवाला कसलं
कितीपण करा ही कामं नीट"




जाता जाता काल सहजच
हे शब्द मज कानी पडले
त्या बायकोच मन जणू
'जीवन' दु:खाला कंटाळून रडले




थबकुन थोडासा थांबलो मी
अन विचारचक्र थैमान घाली
साद देताना त्या दु:खाला
पावले माझी काहीशी थरथरली




तो ही दु:खीच होता बहूत
करत होता दु:खाचा कावाबावा
गुंफत होता जणू दुःखमाळ
अन होउन त्रस्त त्यान दु:खदाखला द्यावा




हे योग्य होतं का खरच त्यांच
हा विचार मनी मज डोकावला
अखेर तो मोडीत काढत मी
त्यांचा दुःखमनोरा पार झुकवला




ठिणगीचीच आग लागत असते
हे असले जरी त्यांस ठाऊ
ठिणगीचा सही वापर करुन
मग आगीचा का करतात बाऊ




आयुष्याच नाण उंच फेका
दु:खाला छापा सुखाला समजा काटा
पदरात काहिही पडो
करू नका फक्त दु:खाचा बोभाटा




दिवस सारखे राहत नसतात
तशाच बदलतात काळोख रात्री
पण रात्रिनंतर दिवसच आहे
याची प्रत्येकालाच असते खात्री



म्हणुनच,


कंटाळवाण जरी वाटत असलं
तरी या जीवन-नशीबाला देऊ नका दूषण्ण
सुखाचे क्षण वेचायला शिकत
तुम्ही आपलं मन करारे प्रसन्न
                  मन करारे प्रसन्न.........

कवी :- अनिकेत स्वामी, अकलूज
९५५२०३०८२८