तू .. ( कविता )

Started by Chetan Thakare, November 16, 2014, 05:06:53 PM

Previous topic - Next topic

Chetan Thakare

तू  .. ( कविता )

असा दुर मी..
तशी दुर तू ..
असा दुर मी ..
तशी दुर तू ..
असे किती ..
अंतर तरी हे ..
असा समोर मी ..
अशी समोर तू..

कडू पापण्यांना..
ते भास तुझे ..
तरी किती ग ..
गोड तू ..
तशी होती भेट ..
रोज तूझी ..
तरी मनाची ..
ती ओढ तू ..

हर एक ओठी ..
नाव तूझे ..
हर एकाची  ..
खोड तू ..
हर एकाला  ..
सोडून दे ..
हि गाढ माझ्याशी ..
जोड तू ..

माझ्या कवितेचा ..
मुड तू ..
विरहाचा तो ..
सूड तू ..
किती लिहावे ..
तुझ्या परी ..
माझ्या शब्दांची ..
जोड तू  ..

कोवळे माझे
मन तू ..
आनंदाचे ..
हे क्षण तू ..
किती वेचू  ..
तुला शब्दात ..
शब्दांची माझी ..
तडजोड तू ..

©  चेतन ठाकरे ..