ग्वाही

Started by Mangesh Kocharekar, November 17, 2014, 02:27:03 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar

                ग्वाही मी तुझी भेट घ्यायची ठरवली पण निम्मत मिळत नव्हते
           तुला भेटण्यास मी का आतुर खरच  मलाच काळात नव्हते
               
तू हो म्हणशील कि सुजवशिल  गाल याची मनी होती भीती
           प्रेमाच्या भेटीचे संकेत यात नव्हती माझी काहीच प्रगती
मी मनाचा हीय्या केलां भेटशील  का एस एम एस पाठवून दिला
तो एस एम एस टिचरना गेला मोबाईल नंबरने मला दगा  दिला
    माझी वरात वर्गातून प्राचार्यांच्या कक्षात गेली तेव्हाच मला कळल    
  माझ्या  एस एम एस च्या प्रतापान काही तरी विपरीत असंच घडल
               
प्राचार्य ना संतापले ना रागावले ,का ? याच कोड मला पडल
               
ते बोलत नाहीत हि तर वादळा पुर्वीची शांतता काळीज धडधडल
               
टिचर संतापून निघून गेल्या तेव्हा प्राचार्य हसून मला न्याहाळत  बोलले
           प्रेम करायला का एस एम एस लागतो लेको एकजात तुम्ही नेभळट साले
   
  मी आर्जवी शब्दात म्हणालो सॉरी सर पुन्हा एस एम एस  करणार नाही
   
प्राचार्य खळाळुन हसत  म्हणाले  गधड्या प्रेम न करण्याची देवू नये ग्वाही