कुठे तू आहेस सांग ग ०

Started by Aishu, November 17, 2014, 11:53:39 PM

Previous topic - Next topic

Aishu

कुठे तू आहेस सांग ग त्याला
शोधतोय होऊन सैरा वैरा ग तो तुला

भूतकाळ त्याला विसरवेना
फक्त आठवणी तूझ्या त्याला सावरवेना

सहजरित्या गेलीस त्याला तू सोडून
प्रेमाच्या त्या साठवणीत एकट्याला पाडून

आठवतो ग रोज तुला तो रडून
आईचे ही ग त्याच्या येते ढग दाटून

आईला पाहवेना लेकराची अशी दशा
परत येशील का तू नानासाठी आशा

दुःख होता फार मारितो आईस मिठी
सांगतो की तुच देवी आहेस त्याची त्याच्यासाठी

ना करीतो तो कुठचे व्यसन
करीतो तो फक्त कवितेचे व्यसन(लेखन आणि वाचन),

जिथे कुठे असशील तू आशा
वाचून लक्षात येईल त्याचि ही परीभाषा

तु जिथे कुठे असशील
नक्कीच त्याला विसरली नसशील

नाना हे त्याचे नाव ग..............
उरलेय फक्त आशा हे एकच त्याचे गाव ग........

.......ऐश्वर्या सोनवणे..........

madhav 9527043866

रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं..

...हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं
ती नसताना तिचं असणं प्रेम असतं..

गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं
पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं..

तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं
तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं..

तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं
तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं

raju jadhav

कविता खुप सुंदर आहेत
वाचुन भावना दाटून आल्या