मारूती पावला

Started by डॉ. सतीश अ. कानविंदे, November 19, 2014, 08:14:27 PM

Previous topic - Next topic
मारूती पावला
(२९ नोव्हेंबर १९९७ च्या लोकसत्ता 'किशोरकुंज' मध्यें प्रकाशित)

चिंचेच्या झाडावर होतं भूत
ओरडून बोललं "इथून तू फूट"

आवाज ऐकून दचकून उठलो
तसाच जोरात धावत सुटलो

तोंडात होते मारूतीचे नांव
म्हणालो "देवा, मला तू पाव"

क्षणात मारूती समोर ठाकला
गदेच्या ओझ्यानं होता वाकला

माझ्या हाती गदा देऊन
चिंचेच्या झाडाखाली गेला घेऊन

झाडावर मारूती सरसर चढला
भुताचा एक पाय जोरात ओढला

विचारलं फिरवून गरगर गोल
"कुणाला त्रास देशिल कां बोल?"

भुत म्हणालं "नो बाबा नो
लिव्ह मी नाऊ, लेट मी गो"