अल्बम

Started by Mangesh Kocharekar, November 20, 2014, 03:43:49 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar


                                  अल्बम           
अल्बम पाहता पाहता मी माझ्याच फोटोशी थांबतो
लहानपणी काय गंमत होती माझ्याच मनाशी सांगतो
मोठेपणाचे कटू अनुभव माझ्या फोटोतील छबीशी मांडतो
लहानपण देगा देवा मी निय्यन्त्याकडे मागतांना भांडतो
   जगतांना सुख- दु:ख,उन -पाऊस हे नियमाचे सोबती
   सैनिकान का बाळगावी रणांगण अन लढण्याची भीती ?
   जीवनाच्या  वाटचालीत संकट ही प्रगतीची मोठी नाकी
   अडथळा आल्याशिवाय कळणार नाही प्रयत्नाची महती
प्रत्येक फोटो म्हणजे असतो जगण्याची एक आठवण
फोटोतील दृश्य म्हणजे अनुभूतीची मोहक जुनी साठवण
लहान वयातील प्रसंग म्हणजे निशब्द आनंदाची उधळण 
बालपण म्हणजे निर्व्याज जगण्याचे सुखी अन स्वस्थ साधन
    अश्या अनेक फोटोमध्ये गुंतल आहे माझ वेड मन
    त्या नाजूक आठवणीवर मी फुलवल आहे माझ जीवन
    कधी दमलो,कधी थकलो तर जागृत होते कप्प्यातली साठवण
     अंतरंग धुवून टाकते अन हसवते त्या निरागस फोटोची आठवण
                   मंगेश कोचरेकर