देव माझा गाणगापूरी...

Started by Ankush S. Navghare, Palghar, November 21, 2014, 05:17:58 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

भक्ति म्हणजे काय आहे
शोधत होतो नाना परी
पदोपदी पुसले बहु
मग पाहिले अंतरी
उचंबळलेले प्रेम होते
काय करू नि काय नको
क्षणों क्षणी दिसे मज
एक तेज ह्रुदयांतरी
कधी वाटे खेळ सारा
कधी वाटे सत्य आहे
अज्ञानाच्या कळीकाळे
वाटे सारे मिथ्या आहे
होता होता एके दिनी
दया आली त्याना माझी
दाखविले रूप त्यांनी
भ्रांत नाही उरली मनी
मूर्ति तीच दृष्टी तीच
दिसली होती सुशुप्तिंत
निर्गुण पदुकांच्या रुपे
जो आहे गाणगापुरी
जो आहे गाणगापुरी...

...अंकुश नवघरे
(स्वलिखित)
वेळ. ०१.२३ दुपारी.
दी. २१.११.२०१४