माझी आजी

Started by डॉ. सतीश अ. कानविंदे, November 21, 2014, 06:54:49 PM

Previous topic - Next topic
माझी आजी

(१६ मे १९९३ च्या लोकसत्ता 'किशोर्कुंज'मध्ये प्रकाशित)

बुटुकबैंगण
माझी आजी
बोलता बोलता
चिरते भाजी

गोष्टी सांगत
भरवते घास
प्रत्येक घासाला
मायेचा वास

आजीचे माझ्या
जादूचे दात
बाहेर काढते
पसरून हात

जवळ ओढून
पापी घेते
चॉकलेटसाठी
पैसे देते

रात्री पडते
कुशीत घेऊन
प-यांच्या राज्यात
सोडते नेऊन

रोज रोज देते
करून केक
आजी माझी
लाखात एक