माझ्या चारोळ्याचा संग्रह

Started by Sanil Pange, January 25, 2009, 08:59:42 PM

Previous topic - Next topic

Sanil Pange

एक तारा गळताना

त्याच्याकडे तुला मागितलं

कोणीतरी वाचवावं म्हणून

माझ्याकडे त्याने बघितलं

@सनिल

Sanil Pange

पुन्हा तुझ्या आठवणींन मागे

माझा पाठलाग कश्यासाठी

कोरडा वाळवंट घश्यासाठी

नि चिंब ओलावा उशासाठी

@सनिल

Sanil Pange

काट्यांसकट गुलाब

याचसाठी विकत घेतात

कारण हास्य व अश्रूं

प्रेमात एकत्र येतात

@सनिल

Sanil Pange

तू अलगद हात धरलास

नि दुसरा हातही त्यावर धरलास

दोन हातांच्या एका शिंपल्यात

माझा हात मोत्याने भरलास

@सनिल

Sanil Pange

पायांना मखमल नाही प्यारी

ते जळते निखारे भावले

प्रमाच्या इतिहासात तेच जिंकले

जे काट्यांच्या गवतावर धावले

@सनिल पांगे

Sanil Pange

तुझा सहवास असला की

आभाळही मुठीत येतं

नकळत मग आभाळा येवढं सुख

तुझ्या रुपानं मिठीत येतं

@सनिल पांगे

Sanil Pange

खूप काही सोसावं लागतं

तेव्हां लागतं हाती सोनं

पुण्याई लागते, मनासारख्या हातून

कुंकवाचं माथी होणं

@सनिल

Sanil Pange

ज्यांच्या चरणी स्व:तास समर्पीले

माझ्याशी का वागले असे

मी वेदनेने त्रस्त, ते सारे सुस्त

मी निवांत पडलो ते जागले कसे

@सनिल पांगे

santoshi.world

hi charoli tar superbbbbbbbbbbbbbb ......... mala khup avadali................. :)

काट्यांसकट गुलाब

याचसाठी विकत घेतात

कारण हास्य व अश्रूं

प्रेमात एकत्र येतात

@सनिल

deepkya

TUJHA BOLNA MAJHA LAKSH VEDHUN JATA
TUJHA HASNA MANALA VED LAUN JATA
JEWHA HI YETE TUJHI ATHVAN MALA
NAKALAT DOLYAT PANI DATUN YETA
______________________________________________________
APLYA MAITRIT KHUP KAHI KHAS AHE
KARAN DUR RAHUN HI EKMEKANCHA DHYAS AHE
PAN JAGU TARI KASA ME TUJHYA VINA
KARAN HRUDAYACHYA PRATYEK THOKYALA TUJHICH AAS AHE