असे ही नवरे

Started by nirmala., December 26, 2009, 04:35:50 PM

Previous topic - Next topic

nirmala.

असे ही नवरे  
मध्यंतरी सहज वाटले, नवऱ्यांच्या विविध छटा दाखविणारे किस्से गोळा करावेत. त्या 'नाटय़'मय छटांचा हा गुलदस्ता! ही नवऱ्यांची षट्कोनी आकृती!
१) एक राजनेता नवरा election मध्ये बिझी असतो. बायको बाळंतपणासाठी गेलेली असते. निवडणुकीच्या निकालाची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या नवऱ्यास मतमोजणीच्या निकालाऐवजी घरचा फोन आधी येतो- ''आपल्या पत्नीस 'तिळे' झाले आहे.'' नेता काही विचार न करता इलेक्शन मूडच्या धुंदीत उत्तरतो, ``Oh no! I demand a recounting!!''
२) एक अरेरावी नवरा ऑफिसमधून घरी येतो. नेहमी स्वच्छ दिसणारे घर आज अस्ताव्यस्त पसरलेले दिसते. बिछाना तसाच, किचनमध्ये खरकटी भांडी, मुलांचे कपडे, खेळणी इकडेतिकडे and what not.
''तू दिवसभर करतेस तरी काय?''- तो पत्नीस फटकारतो. बायको हुशार. ती म्हणते- ''त्या प्रश्नाचेच हे उत्तर आहे! आज मी खरोखर काही काम केले नाही. वाटले, त्यामुळे तरी तुम्हाला कळेल की मी दिवसभर रोज काय करते!''
३) रंगेल नवरा- संशयी बायको
एका पार्टीत एक स्त्री Event Manager ला विचारते- ``Excuse me please! ती beautiful तरुणी drinks serve करत होती ती कोठे गेली? दिसत नाही इथे ती?''
मॅनेजर- ''आपणास काय हवे आहे, मॅडम? That girl or the drink?''
पत्नी- ''दोन्ही नाही. Neither girl nor drink! I am searching for my husband!! माझा नवरा शोधते आहे मी!''
४)Hen pecked नवरा-
एका जोडप्याचा वादविवाद जोरात चालू असतो. शेवटी ते प्रकरण संपवावे म्हणून नवरा 'बरं! राहील!!' असं म्हणून आपले 'स्थान' ग्रहण करतो व पुटपुटतो- ``I am a man of few words!'
पण त्यानेही बायकोचे समाधान होत नाही. ती टोमणा मारतेच- ``Yes! But you keep repeating them! समजलं?''-
५) नवीन नवरा-
नुकत्याच लग्न झालेल्या नवरदेवाची त्याचे मित्र खूप तारीफ करतात- ''तू खरंच भाग्यवान आहेस! तुझी बायको, आमची वहिनी, हरिणाक्षी आहे, her lips are like rose buds, तिचा आवाज कोकिळेसारखा आहे, ती गजगामिनी आहे, सिंहकटी आहे!! you're very fortunate!' त्यावर नवरदेव काय म्हणतात- ``I am not so sure! she does not seem to have a single characteristic of a HUMAN BEING! नुसती जनावरे काय कामाची?''
६) शेवटी.. हा प्रेमळ नवरा-
प्रिन्सिपॉलसाहेबांशी झगडा झाल्यामुळे चिडलेली, नव्‍‌र्हस झालेली शिक्षिका टेन्शन घेऊन सायंकाळी घरी येते. नवरा तिला गरमागरम कॉफी देतो, इकडल्यातिकडल्या गमतीदार गोष्टींनी तिला हसवतो, तिचा मूड change करतो व तिला ''असं चालतेच गं! cheer up!' वगैरे म्हणून तिचे सांत्वन करतो. ती स्त्री उत्साहित होते व म्हणते- ``Dear! you are really MY STRENGTH!' नवरा हसतो व तितक्याच प्रेमाने म्हणतो- ``And you are really MY WEAKNESS!'' :)

writer unknown...........

MK ADMIN

hahahahaha  afltaoon hota hey..thanks for sharing  :D  :D  :D  :)

shardul

 :D  :D  :D टोटल फंटास्टिक  :D

swati121

Ekadam bhari ahe he.mast vatal vachun :) :) :) :) :) :D :D :D

Vaishali Sakat