Reply to दमलेल्या बापाची ही कहाणी

Started by shardul, December 30, 2009, 09:57:08 PM

Previous topic - Next topic

shardul

मित्रानो संदीपच्या थकलेल्या बाबाची कहाणीला
मी एक छोटेसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे
झामले का सांगा ह्न please


थकलेल्या बाबाची मी ऐकली हि कथा
आने डोळ्यात पाणी माझ्या बाबाची व्यथा
दुख तुझे थोडे फार कळतेय मला
बाबा तुझ्यासाठी माझा जीव कासावीस झाला
ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना

लाड लाड करताना पाठीवर घेशी
झोप येता देशी मला हाताची उशी
मागण्या आधी सारे पुढ्यातच येई
साऱ्यासाठी तुझी किती दमछाक होई
दिलेस ते सारे ज्याचा अट्टाहास केला
बाबा तुझ्यासाठी माझा जीव कासावीस झाला
ना ना ना ना ना ना ना ना ना ना

डोळ्यात येता पाणी तुझे डोळे झाले ओले
ठेस लागताच मला तुझे डोळे पाणावले
आजारी मी होता तिथ जागलाय कोण
वाचले मी बाबा तू होतास म्हणून
चूक झाली तरी कधी नाही हाथ उगारला
बाबा तुझ्यासाठी जीव कासावीस झाला
ना ना ना ना ना ना ना ना ना

घाई कारे तुला झाली सासरी धाडण्याची
जीव लाऊन लाऊन घराबाहेर काढण्याची
सोडून तुला जाता माझ्हा अडकेल श्वास
खर संग बाबा तुला मी दिला काय त्रास
सोडुनिया जाता तुला कंठ दाटुनिया आला
तुझ्यासाठी बाबा जीव कासावीस झाला
ना ना ना ना ना ना ना ना ना ना

------ देव हळदे

santoshi.world


gaurig





PRASAD NADKARNI



prashantmahadik

Shardul खूप सुंदर अगदी संदीपच्या थकलेल्या बाबाची कहाणी एवढीच सुंदर,........ मनाला स्पर्शून गेली ! "Gr8"

maryline.sebastian