Marathi kavita Facebook
Join us on Facebook

MK Google Groups
Subscribe to Marathi Kavita(MK) Google Group
Email:

Follow Marathi Kavita on twitter
Follow Marathi Kavita on twitter

Author Topic: माझ्यात वेगळे काय..??  (Read 765 times)

Offline MK ADMIN

  • Administrator
  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,372
  • Gender: Male
  • MK Admin
    • marathi kavita
माझ्यात वेगळे काय..??
« on: February 01, 2009, 09:35:38 PM »
दोन डोळे दोन कान
एक तोंड एक नाक
दोन हात दोन पाय
माझ्यात वेगळे काय?

कधी थंड कधी तप्त
धमन्यांमध्ये माझ्याही रक्त
हाडा-मांसाचा गोळा फक्त
अजून दुसरं काय?

मित्रांमध्ये रमतो तसा
एकट्याने दंगतो
आला दिवस जगतो
अन् स्वप्नांमध्ये रंगतो
जगणं माझं ओघानेच
दुधावरची साय

मातीचाच बनलो तरी
रोज अंघोळ करतो
अस्ताव्यस्त आतून तरी
कपडे इस्त्री करतो
काय करतो कशास करतो
मलाच ठाऊक कुठाय?

चष्मा लावून बघतो जणू
चष्म्याविना दिसत नाही
रक्त जरी उसळलं तरी
डोळ्यांमधून पाझरत नाही
आवळलेल्या मुठी माझ्या
ठोसे मारत नाहीत
बुरसटलेले शब्द माझे
क्रांती आणतील काय??

.....जगणं माझं ओघानेच
दुधावरची साय
......हाडा-मांसाचा गोळा फक्त
माझ्यात वेगळे काय..??



....रसप....
दुस~या कवींच्या कविता पोस्ट करताना मूळ निर्मात्याचे नाव टाका. नाव माहित नसल्यास Author Unknown टाका

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
1 + 1 = ? (Answer in number):


Facebook Comments