Marathi kavita Facebook
Join us on Facebook

MK Google Groups
Subscribe to Marathi Kavita(MK) Google Group
Email:

Follow Marathi Kavita on twitter
Follow Marathi Kavita on twitter

Author Topic: ते पण एक वय असतं .....  (Read 300 times)

Offline gaurig

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,160
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
ते पण एक वय असतं .....
« on: February 24, 2010, 04:31:07 PM »
ते पण एक वय असतं
दिवसभर पाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडून कौतुक करून घेण्याचं
ते पण एक वय असतं
हाफ चड्डीत गावभर फिरायचं
आईची नजर चुकवून डब्यातलं खायचं
ते पण वय असतं
मुलींचे स्क्रॅपबुक्स भरायचं
आणि तरीही त्यांच्याशी बोलायला लाजायचं
ते पण एक वय असतं
घरी खोटं बोलून पिक्चरला जायचं
आवाज म्युट करून रात्री एफटीव्ही पाहायचं
ते पण एक वय असतं
तिच्यावरच खरं प्रेम तिला सांगून टाकायचं
तिच्या उत्तराची वाट पाहात रात्रंदिवस झुरायचं
ते पण एक वय असतं
आता छोकरी नंतर नोकरीच्या मागे लागायचं
पॅकेजचा विचार करत बीई ची स्वप्न पाहायचं
ते पण एक वय असतं
लग्नाच्या डोमिनियम स्टेटसआधी तारुण्यातला टोटल
इन्डिपेंडन्स आठवायचं
आई आणि बायकोत कितीही भांडणं झाली तरी आपण
मात्र शांत राहायचं.
ते पण एक वय असतं
प्रिमियम्सच्या चिंतेत रात्रभर जागायचं
शेअर मार्केटच्या तालावर आपल्या इन्व्हेस्टमेंटस्ना
नाचवायचं
ते पण एक वय असतं
आपल्या मुलांचे सगळे हट्ट पुरवायचं
त्यांच्यासाठी स्थळ शोधताना आपलं तारुण्य आठवायचं
ते पण एक वय असतं
सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यावर गॅलरीत पाय
पसरून बसण्याचं
आभाळाकडे पाहात फक्त त्या निर्देशाची वाट
पाहण्याचं.

Author : Unknown

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
10 + 1 = ? (Answer in number):


Facebook Comments