बालभारती - आठवणीतील कविता

Started by MK ADMIN, February 15, 2009, 08:21:32 PM

Previous topic - Next topic

Prachi

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती

गंजदार पांढर्‍या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्‍या शांततेचा निशिगंध

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा

बा. सी. मर्ढेकर


:)

patankar.kunal

हा खूपच चांगला संग्रह आहे. मला १ कविता हवी आहे. सुरवात आठवत नाही, पण त्यातली १ ओळ अशी आहे. 'डोंगर व्हावे पेंगूळलेले, पोफळबागा मंद झुलाव्या'. कोणाकडे असेल तर कृपया येथे द्यावी.

sandeep.k.phonde

hello,
       बालभारती - आठवणीतील कविता ha kavita sangrah khupach chann ahe.....
hya kavita vachun lahan pan jage zale.........
thanx 4 upload ............. ;) ;) ;) ;) 

amit.chavan90

such a great collection.............
me khup divasan pasun ya collection cha vichar karat hoto...... now i find it here
thnk for such a lovely collection.........
marathit mhanaych zal tar.........
"Manapasun AABHARI"

Parmita

khoop chaan watale..punha ekada shalet jawe ase watu lagale...khoop sundar...

ghodekarbharati

हिरवी हिरवी गार पालवी
काट्यांची वर मोहक जाली 
घमघम करती लोलक पिवळे
फांदी तर काळोखी काळी
कुसर कलाकृती अशी बाभळी
तिला न ठावी नागरारीती
दूर  कुठेतरी   बांधावरती
झुकून जराशी उभी एकटी
अंगावरती खेळवी राघू
लाघट शेळ्या पायाजवली
बाल गुराखी होऊनिया मन
रमते तेथे सांज सकाळी
येते परतून नवेच होऊन
लेवून हिरवे नाजूक लेणे
अंगावरती माखून अवघ्या
धुंद सुवासिक पिवळे उटणे

        hi kavita bahudha Indira Sant  yanchi asavi.

nishikantmm

aai varchi kavita jar kunanade asel tar plz post kara!!!
(i remember two three linea
aai mhnaje
vasarachi gay aste
dudhavarchi say aste...
)

suresh shirodkar

नुसतं Spl thanks to सुरेश शिरोडकर - Suresh Shirodkar पुरेसं आहे का?   :(
ह्या कविता शोधून गोळा करायला आणि जेव्हा देवनागरी टाईप करायची अगदी तुटपुंजी सोय होती तेव्हा त्या देवनागरीत टाइप करायला मी किती किती वेळ वाया घालाविला असेन याची कल्पना मीच करू शकतो. निदान तुम्ही माझी दखल तरी घेतलीत त्यातच धन्यता. शेवटी अशा या महान कवींच्या अजरामर कविता वाचकांपर्यंत पोचणे हाच मुख उद्देश आहे.

MK ADMIN


नुसतं Spl thanks to सुरेश शिरोडकर - Suresh Shirodkar पुरेसं आहे का?   :(
ह्या कविता शोधून गोळा करायला आणि जेव्हा देवनागरी टाईप करायची अगदी तुटपुंजी सोय होती तेव्हा त्या देवनागरीत टाइप करायला मी किती किती वेळ वाया घालाविला असेन याची कल्पना मीच करू शकतो. निदान तुम्ही माझी दखल तरी घेतलीत त्यातच धन्यता. शेवटी अशा या महान कवींच्या अजरामर कविता वाचकांपर्यंत पोचणे हाच मुख उद्देश आहे.
Hi
I am admin of MK. what else you would like us to do  ? I know you have done a real gr8 job for this collection for which we thank you and we have also given the credits for same.
what else do you expect ? do let us know.

Thanks.

suresh shirodkar

बघ आई आकाशात सूर्य हा आला|
पांघरून अंगावरी भरजरी शेला||
निळ्या याच्या महालाला खांब सोनेरी|
मोतीयांच्या लावियेल्या आत झालरी||
केशराचे घातलेले सडे भूवरी|
त्यावरून येई त्याची डौलाने स्वारी||
डोंगराच्या आडून हा डोकावे हळू|
आणि फुले गुलाबाची लागे ऊधळू||
नभातून सोनियाच्या ओती तो राशी|
गुदगुल्या करी कश्या कळ्या फुलांसी||
पाखरांच्या संगे याची सोबत छान्|
गाती बघ कशी याला गोड गायन्||
मंद वारा जागवीतो सार्‍या जगाला|
म्हणतसे ऊठा ऊठा मित्र हा आला|| 

- शांता शेळके