आंतरजालात शोधत होतो एकदा
सापडते का काही हरवलेले
ते बोल बोबडे आईजवळ बोललेले
ते खेळ बालसवंगड्यासोबत खेळलेले
तो स्वप्नातला गाव कायमचा सुटलेला
तारा अंतरीचा माझ्या कधिचा तुटलेला
ओळख माझी सांगतील असे काही चेहरे
विचारपुस माझी करतील असे सगेसोयरे
भिकार्याला रत्नांनी भरलेला घडा सापडला
न जाणे एक दिवस कसा धागा हा गवसला
तु नाळ जोडली माझी पुन्हा त्या आईशी
'मायबोली' तुझी परतफेड करु कशी ??
आपले खरचं खुप खुप अभिनंदन...
