उठा! जागे व्हा, उजळून दाही दिशा - प्रगती ची झेप ग्ह्या.
त्या आधी, पांघरूण ओढा, डोळे मिटा, ८ तास झोप ग्ह्या !
खुशाल झोपा 'विकून घोडे', का मोजता किती तास सरत आहेत?
ऐकण्यात आले, येथे कर्तबगार मंडळी, झोपे आभावी मारत आहेत !!
काळ स्थळाचे बंधन कसले, ग्ह्यावा पूर्ण विराम.
थकल्या जीवास, निखळ, द्यावा झोपेचा आराम !!
ते लोक आहे भाग्यवंत, झोपले विसरून काळज्या अनंत.
काहींच्या नशिबी झोपच नाही, बिघडले ज्यांचे झोपेचे तंत्र!
रणरणत्या उन्हात, वाळाचे तट्टे - घेऊन येते गार झुळूक.
गुंगी येते मस्त अशी, आणि मिळते निद्रेचे अगाध सुख!!
मिळते निद्रेचे अगाध सुख.... zzz...zzz...
रवी जोशी | महाराष्ट्र दिन | ०१ मे २०११