वेडे मन

Started by kalpana shinde, December 26, 2011, 12:50:20 PM

Previous topic - Next topic

kalpana shinde

वेडे मन

करते मी प्रयत्न
नेहमी तुला विसरण्याचा
कदाचित आठवणीना हि
माहित पडले खोटा
प्रयत्न माझ्या मनाचा

मनातले प्रेम तुला
दाखउ शकत नाही
जगासमोर  तुझे प्रेम
व्यक्त करू शकत नाही

कदाचित हीच शिक्षा
आहे अप्लाय प्रेमाची
अश्रू धाल्ण्याची जुनी
सवय आहे माझ्या नैनांची

अश्रू हि माझे सुकले आता
दिला इशारा तू जाता जाता
करतेस जेवढे त्याचाय्वर प्रेम
जगेल काय तो तुझ्या करिता

नाही अपेक्षा तुझ्याकडून माझी
माझ्या बरोबर आहे सावली माझी
त्या सावलीतही तुझेच प्रतिबिंब दिसते
वेडे माझे मन मग मलाच हस्ते

तू मला भेटणार नाही
माहित आहे मला
अजूनही आशेचा किरण
दिसतो या मनाला
(कल्पना एस (मोना)
२३.७.२००१.

केदार मेहेंदळे

नाही अपेक्षा तुझ्याकडून माझी
माझ्या बरोबर आहे सावली माझी
त्या सावलीतही तुझेच प्रतिबिंब दिसते
वेडे माझे मन मग मलाच हस्ते


khup chan...