आज तुला पाहिलं अन
क्षणभर पाहतच राहिले
जुन्या आठवणीतील क्षण
जणू आपोआपच समोर दिसू लागले
कडू- गोड आठवणीनी तर
मनाला घेरूनच टाकले
काहीही न बोलता हि
नयन मात्र हे भरुनी आले
मान्य आहे मीच होते
जबाबदार त्या घटनेला
तुझ्या माझ्या नात्यातील
रेशीम बंधांची वीण सोडायला
कस समजावू आता मी तुला
माझ्यावरही होता अधिकार कोणाचा
नव्हते तोडायचे आपले प्रेमाचे नाते
पण रक्ताच्या नात्यासाठी त्याग करावा
लागला सर्वस्वाचा
समजून घे न तू हि थोडफार
सगळीच नाती नाही घेत आकार
तुझ माझ हि आगदी तसच होत
त्यामुळेच तर स्वप्ने झाली नाहीत साकार
मी कोणाची तरी झालेली पाहताना
तू खरच आहेस खूप दुखावला
आता एकाच मागणे आहे देवाकडे
तुझ्या प्रेमात नाही पण द्वेषात तरी स्थान मिलो मला
आपल्या प्रेमाची शपथ घेऊन सांगते
मला कधी दुखवायचे नव्हते तुला
माझ्या साठी तर तूच होतास
सर्वस्व माझ्या ह्या जीवनातला
तुझ्या शिवाय हे जीवन कंठणे
अशक्यच आहे मला
पण तुला माझ्याशिवाय एकदातरी
सुखी होताना पाहायचं मला
(मोनिका साळुंके )