सिंहासनावर बसलो म्हणून
कोणी राजा होत नाही .....
कोणाच्या कविता copy करून
कुणालाही कवी होता येत नाही ....
बरेच असतात हौशे नौशे
मग फेराफार करतात शब्दांची ...
मानुसकीचीही शंका येते
त्यांच्या अशा या कर्तुत्वाची .......
पण मानायलाच पाहिजे
या लोकांचा कर्मभाव....
धाडस दाखवतात अन
कळाल कि दिसतात उर्मट भाव ....
ctrl +c अन ctrl +v
चाव्या सापडतात सहजच ...
स्व:ताची ओळख दाखवण्यासाठी
विसरतात माणुसकीचा समाजच....
दु:ख नाही मला
ते फक्त शब्दच copy करतील
भावना कशा असतात याचा
त्यांना प्रत्येय कुठून येईल............?
उंच उडणाऱ्या कावळ्याला
समुद्र पार करता येत नाही .....
कोणाच्या कविता copy करून
कुणालाही कवी होता येत नाही ......
महेश मनोहर कोरे
९९६०२६९१९३. पुणे