Marathi kavita Facebook

Download FREE Marathi Kavita Android App
Android app on Google Play

Receive Marathi Kavita in your email.
Email:

Follow Marathi Kavita on twitter

Author Topic: सत्यात उतरलेले राशी भविष्य  (Read 2675 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 798
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
                                                                सत्यात उतरलेले राशी भविष्य
                    नोट : ही कथा पूर्णतः सत्य घटनेवर आधारित आहे , या घटनेतली पात्र खरी आहे त्यांचा जीवित व्यक्तींशी थेट संबंध आहे,  काही साधर्म्य आढळल्यास तो योगायोगच समजावा.


             ही कहाणी सुरु होते ती आपल्या हिरोचे ऑफिस सुटल्यानंतर, हिरो रोजच्याप्रमाणे आपल्या ऑफिसच्या मित्रांसोबत घरी जाण्यासाठी निघाला होता, साधारण वेळ असेल ७.१५ ते ७.३७ . हिरो मित्रांसोबत गोरेगाव स्टेशनला येतो. स्टेशनला पूर्वेकडून हिरो आणि त्याचे मित्र स्टेशन मध्ये प्रवेश करण्यासाठी नेहमी वापरत असलेल्या ब्रिजचा वापर करत असतात. हीरोचे मित्र पुढे ब्रिज चढत होते आणि आपला हिरो पाठीच होता.
         हिरोच्या पाठीवर Sack होती. चढत असताना sack ला कुणी छेडत असल्याचे त्याला जाणवले, म्हणून हिरोने पाठी पाहिलं. हिरोने मागील व्यक्तींकडे लक्ष दिले तर जे होते ते आपल्याच नादात असल्याचे जाणवले जसे काही घडलेच नाही. त्याने Sack पहिले तर सर्वात बाहेरचा कप्पा होता, त्याची चैन ओपन होती. हिरोच्या चांगल्या लक्षात होते की त्याने ऑफिसचे ओळखपत्र त्या कप्प्यात ठेवून नीट चैन लावून बंद केले होते.
        चोरी करण्याचा प्रयत्न हिरोच्या लक्षात आल्यावर त्याने पुन्हा त्या गर्दीत पहिले तिथे संशय घेण्यासारखे कुणी दिसत नव्हते. कप्प्यात ओळखपत्र तसेच होते ते खात्री करून त्याने पुन्हा चैन लावली, तोपर्यंत त्याचा मित्रांना सगळा प्रकार कळला होता. पण ७.३७ ची ट्रेन असल्याने तिथे जास्त वेळ न थांबता ते निघाले गाडीसाठी.
        हिरो काहीतरी आठवल्यासारखे झाले आणि त्याचा लक्षात आले की रविवारी आईने राशी भविष्याबाबत वाचून सांगितले होते की या सप्ताहात पाकीट चोरीपासून सावधान राहा म्हणून. हिरोला तेव्हा आयुष्यात पहिल्यांदाच भविष्या खरे झाल्याची अनुभूती आली होती.
                                                                          -- समाप्त --


स्थळ  : गोरेगाव स्टेशन
कलाकार  : हिरो (मी स्वतः म्हणजे हर्षद कुंभार) , विलन : जो कुणी चोरी करण्याचा प्रयत्न करत होता तो , इतर : माझे मित्र आणि आजूबाजूची लोक
दिग्दर्शन : बहुतेक देवाने केले असावे. तो करता करविता नाही का. 
संकल्पना : सकाळ पेपर राशीभविष्या
कथा ,पटकथा   : हर्षद कुंभार
वितरक : फेसबुक , ब्लॉग 


         


हर्षद कुंभार
http://www.harshadkumbhar.blogspot.com

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक दोन किती ? (answer in English number):


Facebook Comments