दिवस आता बदलत चाललेयत (गमन)

Started by केदार मेहेंदळे, March 12, 2012, 11:48:13 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

हल्ली काय झालंय कळत नाहीये
वस्तू काही टिकत नाहीयेत
अन माणसं काही मरत नाहीयेत

use & thro चा जमाना आहे
वस्तू repair करण्या पेक्षा
नवीन घेण्यात शहाणपणा आहे
माणसांना आणि नात्यांनाही
हाच नियम लागू आहे

भिगडलेल्या   वस्तू
repair होत नाहीयेत
भिगडलेली नातीही
repair होत नाहीयेत
replacement साठी
part मिळत नाहीयेत
Hart Replacement मात्र
कठीण नाहीये

जुन्या वस्तूंना
exchange offer मिळतेय 
म्हातार्यांची किंमत
शुन्न्याच्याहि खाली जातेय
भंगार मध्ये
जुन्या वस्तू किलोनी खपतायत
वृध्धाश्रमात
म्हातारे मात्र  खितपत पडतायत

वस्तूंचा guaranty period
कमी होत चाललाय
माणसांची expiry date
वाढत चाललीय
कंटाळा आला तरी खुरडत खुरडत
आयुष्याची गाडी ओढण चाललय

हल्ली काय झालाय काळात नाहीये
वस्तू काही टिकत नाहीयेत
अन माणसं काही मरत नाहीयेत

केदार...
माझ्या 'गमन' ह्या संग्रहातून
  संन्याशाची   कथा (गमन)
  http://marathikavita.co.in/index.php/topic,7885.msg25321.html#msg25321



मुक्ती (गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,7749.0.html