" कमाई " -आनंद गुंडीले---जळते निखारे या काव्य संग्रहातून

Started by Anand Gundile, March 19, 2012, 06:19:42 PM

Previous topic - Next topic

Anand Gundile



         " कमाई "

दारूच्या नशेत तर्रर होवून

सायंकाळी हॉटेलात आला ' तो बाप ' ?

पोराचा दिवसभराचा रोजगार

रोजच्या प्रमाणे उकळण्यासाठी

नऊ वर्षाचा बच्चा हळहळला

त्याला वाटले...?

आपण दिवसभर राबायचे

हा येवून दारूत घालणार

आपली मेहनतीची ' कमाई '

घरची आठवली ती भाबडी बहिण

आणि तीन दिवसांची उपाशी आई

जर्जर आजाराने मृत्युशय्येवर

शेवटच्या घटका मोजत पहुडलेली

त्याने नकार दिला  ' कमाई ' देण्यासाठी

पण अचानक

क्रुद्ध बापाच्या रक्तातील दारू

उसळून निघाली संतापाने

येवढ्यात जोरदार दगड पडला

त्या कोवळ्या जीवाच्या मस्तकात

आणि जीवन नावाची ' कमाई '

उधळली गेली मृत्युच्या दुकानात

आणि दारू पुन्हा सरस ठरली

बेगडी नैतिकतेच्या बाजारात

हमेशा सारखी..................

                        -आनंद गुंडीले   

केदार मेहेंदळे

....... kaay mhnu...

आणि जीवन नावाची ' कमाई '

उधळली गेली मृत्युच्या दुकानात

आणि दारू पुन्हा सरस ठरली

बेगडी नैतिकतेच्या बाजारात


kadhi kadhi hech khar watt.