स्पर्धा (गमन)

Started by केदार मेहेंदळे, May 28, 2012, 10:31:41 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

प्रतिस्पर्धी तुल्यबळ दोन्ही
ठाकले उभे समोरा समोर
ना मानती हार दोघेही
मृत्यू अन जीवन

जीवन फुलावी हसरा चेहरा
परी ना दिसे त्यात कला
मृत्यू मात्र कलाकार मोठा
वेगळी पद्धत प्रत्येक वेळा

जीवन दिसे डोळ्याला
परी मृत्यू अदृश्य सदा
स्वताहा ना येता पुढे कधी
घेऊन जाई जीव कसा

चालली स्पर्धा दोघांची
जिंकणार कोण ना माहिती
नियतीच खेळवे दोघाना
करण्या करमणूक स्वतःची



केदार...
 वडाची पूजा(गमन)
  http://marathikavita.co.in/index.php/topic,8694.msg28619.html#msg28619


कोणी तरी असतंतिथ. (गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,8570.0.html