अजंठा (fantasy - uncensored)

Started by केदार मेहेंदळे, June 11, 2012, 10:11:48 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

आज अचानक गंधित झाले
इतिहासाचे पान जणू
तुझ्या रूपाने सजीव झाले
अजंठाचे शिल्प जणू

घट्ट कंचुकी अधिक फुलवते
उभार गोलवे तुझ्या वक्षांचे
अन कोवळ्या केळी जैसे
कोमल दंडाचे मऊ गोलवे

सपाट पोटा वरून घसरले
नाभी खाली वस्त्र तुझे
नजरेलाही बंदिस्त करते
मादक कटीचे   वळसे तुझे

उंच मान अन नाजूक खांदे
सुडौल बांधा, कमरेचे वळसे
सावळी कांती तुझी खुलवते
अंगावरचे गोड गोलवे

वक्षांवरची घट्ट कंचुकी अन
कटी खालचे वस्त्र तुझे
झाकण्या ऐवजी अधिक खुलवते
न दिसणारे अंग तुझे

डोळ्याना जरी सुखवून जाते
अर्ध झाकले रूप तुझे
बंद डोळ्यांना परी दिसते
पूर्ण नग्न हे रूप तुझे

वर्णन करता शब्द संपले
उरलीस तरीही तू बाकी
निशब्द पणे तुला पहाणे
हीच तारीफ तुझी खरी

शिल्प सर्वही भंगून फुटली
असुयेत जाळूनी आज जणू
तुझ्या रूपाने सजीव झाले
अजंठाचे शिल्प जणू

केदार....
(माझ्या fantasy - uncensored ह्या संग्रहातून)

सावळा पाउस (fantasy - uncensored)

http://marathikavita.co.in/index.php/topic,9167.msg30123.html#msg30123

रंगपंचमी (fantasy - uncensored)
http://marathikavita.co.in/index.php/topic,7778.0.html

MK ADMIN

#1
Check the comment here :)
https://www.facebook.com/marathikavita/posts/392200264148608?comment_id=79927632&offset=0&total_comments=1

Mala vicharal tar yaat kilas yenya sarkha kahi nahi....And after its posted in "शृंगारिक कविता"

केदार मेहेंदळे

MK Admin.

Thank you for support. Can you please send me the comment on FB to my email as I do not have access to FB. I can explain my views.

Moreover when I am sending personal message I did not see it in send items. like the above message I had send to MK Admin. But it is not appering in the sent items. Hence I am again posting this comment here.

kedar

shashaank

Dear Kedar,
Very nice and MADABHAREE........
keep it up......

केदार मेहेंदळे

Shashank,

Thank you. your appreciations is valuable for me and will keep me going..... Thanks

MK ADMIN

#5
Posting as it is.

Rajiv Masrulkar गोलवे , घट्ट कंचुकी , वळसे , अर्ध आणि पूर्ण नग्न रूप या पुनरूक्तीने आणि एक कलेचे दुसऱ्‍या कलेत थोडे का होईना , अश्लील वर्णन केल्याने अशा कवितेची किळस येऊ शकते .
क्षमस्व !

केदार मेहेंदळे

MK Admin,

thank you.

Rajiv Masrulkar sir,

तुम्ही  माझी  कविता  वाचलीत  आणि  तुमच  मत  नोंदव्लात  त्या  बद्दल  धन्यवाद.
गोलवे , घट्ट कंचुकी , वळसे , अर्ध आणि पूर्ण नग्न रूप ह्या  शब्दांना  प्रती  शब्द  मला  तरी  माहित  नाहीत. ह्यात 
किळसवाण  काही  लिहिण्याचा  माझा  इरादा  न्हवता. हि  एक   शृंगारिक  आणि  शरीर  सौंदर्याची  वर्णनात्मक  कविता  आहे. 
कलाकारांना  आपल्या  कलेत  काही  किळसवाण तर  नाही, काही  वाईट  तर  नाही  असा विचार  करायला  लागला  तर  कलाकारांना  त्यांच्या  कला  निखळ  पणे सादर  करता  येणार   नाहीत.
जोवरी  कोणावर  वैयक्तिक  टीका  किंवा  कोणाच  वैयक्तिक  नुकसान  कलाकार  करत नाही  तोवरी  कले कडे  आपण  एक  अविष्कार  म्हणून  बघायला काय हरकत आहे.
माझ्या (fantasy - uncensored) ह्या संग्रहात सर्व कविता शृंगारिक आहेत. त्यामुळे कृपया ह्या कवितां कडे गढूळ नजरेनी बघू नका हि विनंती.
   
तरी सुद्धा तुमच्या भावना दुखावल्या असल्यास क्षमस्व.

केदार.. 

shashaank

प्रिय केदार,
श्रुंगार हा एक साहित्यातील नवरसांपैकी एक असून त्यात किळसवाणं असं काहीच नाही, उत्तानता असू शकेल पण चुंबन, रतिसुख हे श्रुंगारातीलच भाग असल्याने त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे ?
बीभत्स हा देखील नवरसांपैकी एक असून त्यात किळसवाणंही येऊ शकतं व साहित्याला ते ही मान्य आहे कारण जीवन हे नवरसपूर्ण असून काही गोष्टी आपण समाजधारणेकरता निषिद्ध (त्याज्य) समजल्या आहेत एवढेच. पण त्या अमान्य करण्यात काय अर्थ आहे ? जो परिपक्व नाही तोच असे पोरकट विचार मांडू शकेल.

स्त्रीच्या ठायी निसर्गानेच सृजनाकरता काही विशिष्ट शरीरबदल केलेले असून नर त्याकडे आकृष्ट होणे हे ही नैसर्गिकच आहे.
एखाद्या चांगल्या श्रुंगाररसपूर्ण कविता वा रचनेला उगाचच अश्लील, उत्तान असे म्हणून नावे ठेउन म्हणून काहीजण स्वतःच्या नजरेतला दोषच इतरांना दाखवतात असे मला तरी वाटते.

कुठल्याही स्त्रीची विटंबना होईल असे वर्णन नसले म्हणजे झालं - तसं पाहिलं तर महाकवि कालिदासाचे सगळे वाङ्मय हे अश्लीलतेनेच भरले आहे असे बर्‍याच जणांना वाटू शकेल.......

जेव्हा सनातनी मंडळींचा पगडा समाजावर होता तेव्हाही विवाह निमंंत्रण पत्रिकेत - श्री. अमुक अमुक यांचा शरीरसंबंध चि. सौ. कां. अमुक अमुक यांचे बरोबर करण्याचे योजले आहे.... - असे चक्क लिहित असत - आता बोला ?

त्यामुळे अखेर आपल्या अंतर्मनाला स्मरुन जे लिहू ते उत्तमच असे समजून लिहित रहाणे....

केदार मेहेंदळे

Thank you Shashank,

Khara tar FB varch mat vachun mala mazhya hya sangrhatlya saglyach kavitan baddalach vegla vichar karava ki kay asa prashn padla hota. aani ugach mi kahi tari far bhayankar wait lihil aahe as watayla lagl hot. Pan tumhi aani MK adminni mala dhir dila aahe.

thanks to both of you and all the readrs....

MK ADMIN

प्रिय केदार,
श्रुंगार हा एक साहित्यातील नवरसांपैकी एक असून त्यात किळसवाणं असं काहीच नाही, उत्तानता असू शकेल पण चुंबन, रतिसुख हे श्रुंगारातीलच भाग असल्याने त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे ?
बीभत्स हा देखील नवरसांपैकी एक असून त्यात किळसवाणंही येऊ शकतं व साहित्याला ते ही मान्य आहे कारण जीवन हे नवरसपूर्ण असून काही गोष्टी आपण समाजधारणेकरता निषिद्ध (त्याज्य) समजल्या आहेत एवढेच. पण त्या अमान्य करण्यात काय अर्थ आहे ? जो परिपक्व नाही तोच असे पोरकट विचार मांडू शकेल.

स्त्रीच्या ठायी निसर्गानेच सृजनाकरता काही विशिष्ट शरीरबदल केलेले असून नर त्याकडे आकृष्ट होणे हे ही नैसर्गिकच आहे.
एखाद्या चांगल्या श्रुंगाररसपूर्ण कविता वा रचनेला उगाचच अश्लील, उत्तान असे म्हणून नावे ठेउन म्हणून काहीजण स्वतःच्या नजरेतला दोषच इतरांना दाखवतात असे मला तरी वाटते.

कुठल्याही स्त्रीची विटंबना होईल असे वर्णन नसले म्हणजे झालं - तसं पाहिलं तर महाकवि कालिदासाचे सगळे वाङ्मय हे अश्लीलतेनेच भरले आहे असे बर्‍याच जणांना वाटू शकेल.......

जेव्हा सनातनी मंडळींचा पगडा समाजावर होता तेव्हाही विवाह निमंंत्रण पत्रिकेत - श्री. अमुक अमुक यांचा शरीरसंबंध चि. सौ. कां. अमुक अमुक यांचे बरोबर करण्याचे योजले आहे.... - असे चक्क लिहित असत - आता बोला ?

त्यामुळे अखेर आपल्या अंतर्मनाला स्मरुन जे लिहू ते उत्तमच असे समजून लिहित रहाणे....

@shashaank ji: Waah ..utaam reply dila ahe.....ata he comment ammhi FB fan page var tumchya nava sakat post karu jene karun uggach tika karnarya lokanchya dokyat thoda prakash padel :)

@Kedar Ji:  Continue posting your poems in this category.... Khara tar bhashecha tol na javdu deta tumhi ek apratim rachna sakarli ahe....keep it up. :) If you have subscribed to our Google Group (15K+ members already) , we have promoted this poem in yesterdays group mail.  Enjoy MK :)

@shashaank Ji :  tumchi "अरे थेंबा तुझी आस." he kavita suddha ya group mail madhye hoti :)