ह्यालाच तर प्रेम म्हणतात....

Started by Ankush S. Navghare, Palghar, December 16, 2012, 11:33:04 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

तु माझ्यापासून दूर
माझ्या हृदयात आठवणींचे पूर
तुझ्या गोड आठवणीच मला
दिवस रात्र स्मरतात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....

काही क्षण आपण एकमेकांसोबत घालविले
कधी मी तर कधी तु मला हसविले
पण थोडयाश्या आठवणीही जेव्हा
हृदयात खोल रुततात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....

आपण एकमेकांना भेटलो
काही काळ एकमेकांसाठी जगलो
स्वतःसाठी न जगता जेव्हा
दोन जीव एकमेकांसाठी जगतात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....

जेव्हा रडू तुला आले की
अश्रू माझे वाहायचे
जेव्हा हसू मला आले की
डोळ्यात तुझ्या चमकायचे
दुख असो की आनंद
जेव्हा दोघ एकत्र अनुभवतात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....

प्रेम कधीही होऊ शकते
कोणावरही होऊ शकते
कधी झाडावर तर
कधी मातीवर होऊ शकते
जेव्हा कुठच्याही नात्याची
मुळे खोलवर रुजतात

ह्यालाच तर प्रेम म्हणतात....
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush



केदार मेहेंदळे


sakina


Madhura Kulkarni

नसतेस जवळ तू सखे जरी
तरी असतेस अवतीभवती
तुझ्याच आठवणींत रमती,
सारे क्षण हे असेच सरती.......

@प्राजुन्कुश : अंकुश दादा, छान झाली कविता!

Ankush S. Navghare, Palghar

Sanjay ji, Meghna ji, Kedar Sir, Sakina ji ani Madhura ji...
.... Khup abhar agadi manapasun.

Ankush S. Navghare, Palghar


नसतेस जवळ तू सखे जरी
तरी असतेस अवतीभवती
तुझ्याच आठवणींत रमती,
सारे क्षण हे असेच सरती.......

@प्राजुन्कुश : अंकुश दादा, छान झाली कविता!

Athavaninna ujala deto...
Sadaiva tuzyach manat rahto...
Jevha jevha tula athavato...
Maza haat algad mazya Hrudayakade jato...


Madhura Kulkarni



नसतेस जवळ तू सखे जरी
तरी असतेस अवतीभवती
तुझ्याच आठवणींत रमती,
सारे क्षण हे असेच सरती.......

@प्राजुन्कुश : अंकुश दादा, छान झाली कविता!

Athavaninna ujala deto...
Sadaiva tuzyach manat rahto...
Jevha jevha tula athavato...
Maza haat algad mazya Hrudayakade jato...







साद देतो मी तिला
ती प्रतिसाद देत नाही
पण मौनही तिचे
मज उत्तर देऊन जाई....

Ankush S. Navghare, Palghar

Madhura ji tumhi Khup chan lihita...

Tu kahi mhatale nahi...
Tarihi mi te aaikale...
Nakalat maze hruday tuzya...
Hrudayala jaun milale...

Dhanyavad....