जगून घे जरा ......

Started by SANJAY M NIKUMBH, January 07, 2013, 01:18:17 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

जगून घे जरा ......
...............................

प्रितीच्या या रंगात
रंगूनी तू जा
छंद हा जीवाला
लावूनी तू जा
होऊन जा तू हि
बेभान गं वारा
बघ तुला जमलं तर
जगून घे जरा

मोहर आलाय प्रीतीचा
माझ्या हृदयाला
गंध हा साद घाली
तुझ्या काळजाला
छंद तुझा लागला
बघ न जरा
बघ तुला जमलं तर
जगून घे जरा

आणलाय गं वसंत
ओंजळीत मी भरून
प्रीतीच्या या कळ्या
आल्यात गं उमलून
हे प्रीत चांदण
वेचून घे जरा   
बघ तुला जमलं तर
जगून घे जरा

नको दवडू हे क्षण
येणार न पुन्हा
हातनं निसटले तर
वाटेल तुला गुन्हा
अमृत हे प्रेमाचे
पि  ना  जरा
बघ तुला जमलं तर
जगून घे जरा
प्रिये
बघ तुला जमलं तर
जगून घे जरा .

                                                 संजय एम निकुंभ , वसई
                                              दि. ०७.०१.२०१३ वेळ : १२.३० दु.








केदार मेहेंदळे


shrikant s chavan