सुमनांचे सौंदर्य

Started by Sadhanaa, February 07, 2013, 09:26:45 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

सुमनांचे सौंदर्य   
   गंधात असते
जग मात्र ते
    रंगात बघते ।
सरितेचे गांभीर्य
    संथपणांत असते
जगांस मात्र तिची
   खळखळ दिसते ।
मोठेपण मानवाचे
    विचारांत असते
श्रीमंतीत मात्र ते
    पाहिले जाते ।
मनुजाचे सौंदर्य अंतर
      मनात असते
जग मात्र ते
     रुपात बघते ।
नराचे सौंदर्य 
     संयमात असते
बाह्य शक्ती पाहून
    फक्त जग दिपते ।
स्त्रीचे सौंदर्य
   शालीनतेत असते
जगाला मात्र ते
   नखर्यात दिसते ।
वरवर जे दिसते
   ते मृगजळ असते
त्याकडेच पाहून 
   सारे जग फसते ।।

रविंद्र बेन्द्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this

http://www.kaviravi.com/2013/01/inspirational.html



santoshi.world


Madhura Kulkarni

मस्त! साधना, हि जास्त छान आहे कविता.

Pralhad S. Kokane


dipak chandane


minakshi kurve