प्रेम म्हणजे काय आहे?? प्रेमाची नवी परिभाषा

Started by Ravi Jadhav, April 01, 2013, 11:58:02 PM

Previous topic - Next topic

Ravi Jadhav

]हाई  फ़्रिएन्द्स  माझे  नाव
रवि जाधव  आणि मी घेऊन आलोय तुमच्या साठी प्रेम काविन्ताचा खजिना
मित्रांनो काळ बदल ला वेळ पण बदल ला
त्या नुसार प्रेमाची परिभाषा बदल लि
प्रेम म्हणजे प्रेम आसत
तुमच आमच सर्वांच कस सेम असत
एके काळी आशी होती प्रेमाची परिभाषा
पण आता मात्र सर्वच बदल ले
* प्रेम म्हणजे काय आहे ?
तर
प्रे - म्हणजे प्रेत
म - म्हणजे मरण
जस सकाळी केल आणि संध्याकाळी फेकून दिलं
आस विटलेल वरण
प्रे -म्हणजे प्रेत
म - म्हणजे मरण

प्रेम म्हणजे काय आहे ?
तर
प्रे- म्हणजे प्रेत
म - म्हणजे    म्हसंवाठा
जस सकाळी मन जोडलं
आणि दुपारी ते तोडलं
संध्याकाळी खड्डा खोदून
त्यात तोडलेल्या मनाला टाकून
पहाटे हळूच माती लोटा
प्रे-म्हणजे प्रेत
म -म्हणजे   म्हसंवाठा

प्रेम म्हणजे काय आहे ??
तर
प्रे - म्हणजे प्रेत
म - म्हणजे  मृत्तू
जस ८ च्या लोकाल ने मी येते
ऑटो ने लवकर ये तू
तुझे मन मला दे
माझे मन घे तू
८ दिवस चालते आशी हि क्रिया
हा होतो प्रेम ती आस्ते याची प्रिया
९ व्या दिवशी ती याला म्हणते
बस झालं आता मला कंटाळा आला
हे घे तुझे मन मला हवे नव नव क्षण
मी आता हसत जाते
डोळे पुसत जा तू
प्रे - म्हणजे प्रेत
म - म्हणजे मृत्तु

एके  काळची मुमताज
आणि हि आजची प्रिया
काळ चक्क्र फिरुनी जसा काळ
बदलत आहे
तशी बदलत आहे प्रेमाची क्रिया
प्रेम म्हणजे काय आहे
आय डोंट नो ?????

रवी जाधव रजिस्ट्रे  नंबर ११९२२[/fo
nt][/color]

केदार मेहेंदळे



santoshi.world

प्रेम म्हणजे प्रेम असतं!!! :) ....

मी आणि प्रेम

वाटेवरती सहजच एकदा
मला जेव्हा प्रेम दिसला,
नजर चुकवून मी जावू लागली
तर तो वाटच माझी अडवू लागला.

मी म्हणाली काय आहे
वाटेत का असा आडवा येतोस,
पुन्हा नजरेसमोर येवून
का मला असा त्रास देतोस.

तो म्हणाला :
म्हणटलं आता सरळ
तुलाच जावून विचारुया,
माझ्याबद्दलच्या कडवटपणाचं
रहस्यतरी तुझ्याकडून जाणुया.

फक्त नाण्याची एक बाजु बघुन
तू अख्ख नाणं खोटं ठरवतेस,
म्हणूनच आलोय मी तुला न्यायला
माझ्या बाबतीतलं तुझं मत बदलायला.

तुच आंधळेपणाने
कुणाच्याही प्रेमात पडतेस,
दोष मात्र नंतर त्याचा
मलाच देत बसतेस.

का असते तुला खरंच
प्रत्येक गोष्टीत इतकी घाई,
प्रेमात का ग पडतेस तू
नेहमीच इतक्या लवकर बाई.

प्रेमाची कबुली देण्याआधी
नीट पारख त्या व्यक्तीला,
खरंच देईल का तो शेवटपर्यंत साथ
विचार आधी स्वत:च्या मनाला.

आकर्षणालाच खरंतर तू
प्रेमाचं नाव देतेस,
क्षणाक्षणाला मग त्यात
असंख्य चुका करतेस.

आनंदाचीही आहे गं
एक चांगली बाजू मला,
पण दुखं, अंश्रु आणि विरहच
का बरं दिसतात तुला.

मनातून काढुन टाक राणी
आतातरी माझ्यावरचा राग,
चल करु पूर्वीसारखी मैत्री
यापुढे शहाण्यासारखी वाग.

- संतोषी साळस्कर.



मिलिंद कुंभारे

हि प्रेमाची आणखी एक व्याख्या! :) :) :) :) :)

प्रेम  म्हणजे जीवन असतं
अन जीवनातलं;
गुंतागुंतीच एक वळण असतं!
कधी असतं ते बेधुंद
तर कधी असतं ते स्तब्ध!
कधी असतं ते खळाळनाऱ्या
धबधब्यासारखं!
तर कधी तरंगणाऱ्या
बुडबुड्यासारख!
क्षणात विरघळणारं!
क्षणात तरंगणारं!

प्रेम  म्हणजे जीवन असतं
अन जीवनातलं;
गुंतागुंतीच एक वळण असतं!

मिलिंद कुंभारे


मिलिंद कुंभारे

प्रेम  म्हणजे प्रेम असतं! :) :) :)
एक गुलाबी स्वप्न असतं!
प्रत्येकाचीच झोप उडवतं! :) :) :)