आता तूच सांग

Started by अजय जावळे, April 03, 2013, 09:16:14 PM

Previous topic - Next topic

अजय जावळे

     
तुझ्या डोळ्यात सारखं पहावसं वाटतं
अश्रू आले की मन दाटत
म्हणून नजरेत भय साठत
कसं पाहू
                 आता तूच सांग .....
तुला मिठीत सारखं घ्यावसं वाटतं
बंधनात जखडताना हाताला कंपन फुटतं
म्हणून बंधन सैल पडतं
कसं मिठीत घेऊ
                  आता तूच सांग ......
तुझ्याबरोबर सारखं बोलावसं वाटतं
पण तुला पाहिलं की मन गुंतून बसतं
म्हणून ओठातलं मनातच साठतं
कसं बोलू 
                  आता तूच सांग .....
तुझ्या आठवनित मन सारखं रडतं
अश्रूतुन फक्त तुझच नाव पडतं
म्हणून रडायलाही कोड पडतं
कसं रडू
               आता तूच सांग ........अजय

तू गेल्यापासून सगळ  काही अपूर्ण राहून गेलय,पण अजुनही वेळ गेलेली नाही समजुन घे मला।।।

मिलिंद कुंभारे

आता तूच सांग !!!

हे कोडं सोडवायचं कुणी????????
मोठाच गंभीर प्रश्न!!!!!

खूपच छान कविता आहे! :( :) :) :) :) :)

Ganesh Naidu

स्वंप्न तुझ बघावस वाटतं ..
निद्रेच्या स्वाधीन व्हावेसे वाटतं ..
आठवणी तुझ्या निद्रेला छळतं...
कस बघू स्वप्न ...
                 आता तूच सांग ..

chan kavita ahe :)

अजय जावळे

धन्यवाद मित्रांनो