गूढ ते सांग ना रे सांग ना...

Started by Mandar Bapat, April 09, 2013, 01:59:55 PM

Previous topic - Next topic

Mandar Bapat

असे कसे हे क्षण तरसे सांग ना

गूढ ते  सांग ना रे सांग ना


चिंब भिजला धुंद जाहला

मोहोर पुन्हा कसा बहरला

तव नजरे खेरीज काही दिसे ना

असे कसे हे क्षण तरसे सांग ना 

गूढ ते सांग ना रे सांग ना...


दव पसरला खेद हरपला

हुरूप असा नव्याने गवसला

तव स्पर्श खेरीज काही कळे  ना

असे कसे हे क्षण तरसे सांग ना

गूढ ते सांग ना रे सांग ना...

                                .....मंदार बापट


केदार मेहेंदळे




Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]