वाट

Started by sindu.sonwane, April 10, 2013, 02:54:09 PM

Previous topic - Next topic

sindu.sonwane


अशी एक वाट होती
जी मी बघितली  होती
त्या वाटेवरून मी आणि तू जात होतो
तुझ्या खांद्यावर माझ डोक होत
तुझ्या हातात माझा हात होता गुंफलेला
                 एक नवीन स्वप्न रंगवत जात होतो 
                 पण अचानक घन दाटून आले
                 काळोख  झाला, वीज चमकली
                 आणि मी अलगद तुला बिलगली
इतक्या तुझ्या जवळ आली कि,
तुझा श्वाश आणि माझा श्वाश  एकाच झला
अलगद तुझ्या दूर झली आणि
मनातल्या मनात हसली
                     पण तू माझा हात तसाच घट्ट  पकडून ठेवलास
                     पुन्हा स्वप्न रंगवत गेलो मी पुन्हा तुझ्या जवळ आली
                     तुझ्या नजरेत किती तरी प्रेम समावल होत
                     त्यातच मी गुंतत गेली
पण अचानक कुठून तरी वादळ आल
तुला मला वेगळ करू लागल
तू मला घट्ट  पकडलास
मी हि स्वतःला सांभाळत सांभाळत
तुला सांभाळू लागली
पण त्या वारयाच्या भोवरयात   
मी गुरफटत गेली
आणि तू माझ्यापासून दूर होत गेलास
                      शेवटी वादळ संपल मी माझ्याच वाटेवर होती
                      अगदी तशीच जशी आधी होती
                      पण थोडी थकलेली, हळवी झलेली
                      तू मात्र माझ्यापासून लांब निघून गेलास
                     घट्ट  पकडलेल्या हातातून अलगद तुझा हात  निसटला 
आधी याच वाटेवर तुझा सहवास  होता
डोळ्यात सुंदर स्वप्न  होते
पण आज एकटेपणा आहे
स्वप्नांची जागा अश्रुनी घेतली आहे
आज हि वाट बघते आहे
त्याच वाटेवरून मी जात आहे
कदाचित तुझी सोबत पुन्हा मिळेल.........................????
                                                                    सिंदू

Preetiii


Shrikant R. Deshmane

lai bhari kavita sindhuji..
khup aavadli...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

sindu.sonwane

Thanks, Preeti and Shrikantji.

manubhau

लोक म्हणे लई भारी आमचा भारत देश..
गरीबाचा पायाला लागे महागाई ठेस ..
अन श्रीमंतांचे उडती ac चा हवेने केस..
लोक म्हणे लई भारी आमचा भारत देश..(१)
दादा - काका चा राजकारणात नुसतीच रेस ..
आज बनी देव तर उद्या दानव चा वेश ..
तुमचा परी अरे ते इंग्रज होते बेस्ट..
लोक म्हणे लई भारी आमचा भारत देश..(२)
उन्हाळी हिवाळी अधिवेशनावर करी पैशाची होळी..
गोंधळ उडवून काम थांबवायची आमची जुनीच खेळी ..
पैशाचा चा राजकार्नापुध चुकतो आमचा गेस ..
लोक म्हणे लई भारी आमचा भारत देश..(३)
गस ,पेट्रोल,डीझेल चे दर इथे रोजच वाढे..
स्विस बँकेत ला पैसा मात्र कुणी न काढे ..
पाण्याविना दुष्काळाचा राजकारण च बेस्ट ..
लोक म्हणे लई भारी आमचा भारत देश.(५)


मिलिंद कुंभारे